Nashik MBA CET Exam : नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही एमबीए सीईटी परीक्षेत सर्व्हर डाऊन झाल्याने गोंधळ
नागपुरातील एमबीए सीईटीच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं... परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अडचणीच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेला मुकण्याची वेळ आली... सकाळी नऊ वाजल्यापासून ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार होती...
मात्र, ऑनलाइन परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये तांत्रिक गडबड झाल्याने परीक्षा केंद्रात फक्त दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला... तर उर्वरित विद्यार्थ्यांना १० मिनिटात आत घेतो असं सांगून अद्यापपर्यंत परीक्षा केंद्राबाहेरच ताटकळत बसवण्यात आलं... यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केलीये...