Maharashtra : शेतकऱ्यांचा लाँग मार्च ते सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, शिंदे सरकारची दुहेरी परीक्षा

Continues below advertisement

आज आणि उद्या शिंदे-फ़डणवीस सरकारची दुहेरी परीक्षा आहे.. कारण एकीककडे विविध मागण्यांसाठी माकपचा लाँग मार्च निघाला आहे, तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून संपावर जाण्य़ाचा इशारा दिला आहे. दिंडोरीहून निघालेला माकपचा शेतकरी लाँग मार्च आता नाशिक शहरात पोहोचला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र माकपनं ती नाकारली. ज्या क्षणी आमच्या मागण्या मान्य होतील, तेव्हा जिथे असू तिथून माघारी जाऊ अशी भूमिका माकपनं घेतली आहे. दुसरीकडे, जुन्या पेंशन योजनेच्या मागणीबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांनी आज कर्मचारी आणि शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram