Lal Vadal Ajit Navle : शेतकरी नेते अजित नवलेंची बैठक उद्यावर ढकलल्याने नाराजी व्यक्त
शेतकऱ्यांच्या लालभडक वादळाने नाशिक तालुक्याची वेस ओलांडून मुंबईच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवलीय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेला मोर्चा आता इगतपुरीत येऊन धडकलाय. महामार्गावरील आंबेबहुला गावाजवळ रात्रीचा मुक्काम करून, हे वादळ आता इगतपुरीत दाखल झालंय. या मोर्चात अनेक शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध इतकंच काय तर लहान मुलांचे चिमुकले पायही रस्ता तुडवत मुंबईकडे निघाले आहेत. हातात लाल बावटा घेतल्यामुळे या वादळाने रस्तेच्या रस्ते लालभडक झाले आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक उद्या दुपारपर्यंत लांबणीवर पडलीय. त्यामुळे आंदोलक शेतकरी संतापलेत. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकील सरकारने प्राधान्य दिलं, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असं म्हणत, आंदोलक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Tags :
Morcha Farmers Igatpuri Highway Protesting Farmers Dindori | Nashik MUMBAI Displeasure Red Storm Taluka Ves Ambebahula