Eye Conjunctivitis : आय ड्रॉपच्या मागणीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ; नाशिक शहरात आय ड्रॉपचा तुटवडा

Continues below advertisement

Eye Conjunctivitis : आय ड्रॉपच्या मागणीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ; नाशिक शहरात आय ड्रॉपचा तुटवडा नाशिक शहरात सध्या डोळ्यांची साथ आली आहे, आय फ्लु ने नागरीक त्रस्त असतानाच शहरात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवतोय, दोन दिवसांपासून शहरात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत असून मागणीत साधारणपणे 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झालीय. येत्या येऊ दोन दिवसात पुरवठा सुरळीत होईल असा अंदाजही बांधला जातोय.. नाशिक महापालिका आणि जिल्हा रुग्णालयात कुठल्याही स्वरूपाचा तुटवडा नाही मात्र काही मेडिकल स्टोअरमध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. गेल्या 24 तासात महापालिकेच्या रुग्णालयात 444 रुग्णांनी उपचार घेतले असून आठ दिवसातील हा आकडा साधारणपणे 1500 रुग्णांचा आहे, रुग्णांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा,  डोळे चोळू नये, स्वच्छ धुवावे असा सल्ला तज्ञ देत आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram