WEB EXCLUSIVE | 16 जून उजाडूनही नाशिकमध्ये अद्याप पाऊस नाही, नाशिककरांच्या चिंता वाढल्या
Continues below advertisement
16 जून तारीख उजाडूनही नाशिकमध्ये अद्याप पावेतो पावसाने हजेरी लावली नसल्याने नाशिककरांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. बळीराजाही पावसाची आतुरतेने वाट बघत असून पेरण्याही खोळंबल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाने हुलकावणी दिल्याने धरणसाठ्यातील पाण्याच्या पातळीतही घट होत असून जिल्ह्यातील एकूण धरणसाठा 26 टक्क्यांवर आलाय तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठाही 39 टक्क्यांवर आला असून गेल्यावर्षी हाच साठा 47 टक्के होता. पाऊस लांबल्याने गंगापूर धरणाचा अनेक भाग कोरडाठाक पडला असून पावसाने धो धो कोसळावं आणि नद्या नाले ओसंडून वहावेत अशीच प्रार्थना नाशिककर करतायत. दरम्यान गंगापूर धरणावरून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement