Local Recruitment | मराठी तरुणांच्या रोजगारात उद्योजकांची आडकाठी? कामावर घेण्यासाठी अटी शर्ती
एकीकडे कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग गावी निघून गेलाय..त्यामुळे उद्योग सुरु करण्यासाठी मजुरांची कमतरता भासू शकते. अशा अवस्थेत रोजगार मिळवण्यासाठी भूमिपुत्रांना अर्थात मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. मात्र, दुसरीकडे मराठी तरुणांना कामावर घेण्यासाठी उद्योजकांकडून अटी शर्थी लावल्या जात असल्याची माहिती मिळतीय..कमीत कमी 3 वर्ष कामगारांनी कुठल्याही कामगार युनियनचा सदस्य व्हायचे नाही, राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता कंपनीत काम करावं.. यासारख्या अटी उद्योजकांच्या संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी लादल्या आहेत...