Lockdown 4.0 | एक जूनपासून सुरु होणाऱ्या 200 रेल्वेसाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग
गेल्या दोन महिन्यांपासून देशातली विमानसेवा ठप्प आहे.. मात्र आता पाच दिवसांनी म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.. हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. यासंदर्भात पुरी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत. दुसरी मोठी बातमी ट्रेन्स संदर्भातली..१ जूनपासून देशभरात २०० पॅसेंजर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेन्समधील तिकीटांची ऑनलाईन बुकिंग आज सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहे... एसी, नॉन एसीसह जनरल कोचसाठीही आरक्षित तिकीटच घ्यावं लागणार. विशेष म्हणजे रेल्वेची सर्व तिकीटं ऑनलाईन पद्धतीनंच आरक्षित करुन घेता येणार