Diwali 2021 : Nashik : उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे.. कारण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते. मात्र हे निर्णय मागे घेण्यात यावेत म्हणून भुजबळांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला. माझी वसुंधरा अभियानात चांगले गुणांकन मिळावे, दिवाळीच्या काळातही हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी उत्तर महाराष्ट्रात फटाके बंदीचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे घेतला होता. मात्र यामुळं नाशिक, नगर, धुळे, जळगांव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यात पडसाद उमटले होते. लोकप्रतिनिधी, नागरिक आणि फटका व्यावसायिक साऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram