CM Eknath Shinde Nashik : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकपासून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत... नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस दिली जातेय. दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करू नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी नोटिशीद्वारे दिलाय. नाशिकमध्ये शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये याआधीही संघर्ष झालाय. त्यामुळे पोलीस विशेष खबरदारी घेतायत....