नाशिकमध्ये बर्ड फ्लूच्या भीतीने चिकनची मागणी 50% कमी, मटण खाण्यास ग्राहकांची अधिक पसंती
बर्ड फ्लूने महाराष्ट्रात शिरकाव करताच आता हॉटेलमधिल गर्दीही कमी झाल्याचं बघायला मिळत असून चिकनपेक्षा मटणच्या मागणीत वाढ झाली आहे. नॉन व्हेज साठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या महाराष्ट्र दरबार हॉटेलमध्ये खास करून रविवारी नॉन व्हेज प्रेमी मोठ्या संख्येने दाखल होत असतात मात्र आज नेहमीपेक्षा कमी गर्दी इथे दिसून येते आहे विशेष म्हणजे ग्राहकांकडून चिकनची मागणी 50 टक्के कमी झाली असून त्या तुलनेत मटण खाण्यास ग्राहक अधिक पसंती देत असल्याचं हॉटेलचालक सांगतायत.