Ajit Pawar Nashik Tour : नाशकात राडा, अजितदादांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी फेकला टोमॅटो-कांदा
abp majha web team
Updated at:
07 Oct 2023 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक : एकीकडे कांद्याचा प्रश्न (Onion Issue) तिढत असताना आता टोमॅटोचे दरही (Tomato rate) कोसळले आहेत. यामुळे नाशिक (NashiK) जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. याच प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाहन ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर अडविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र काही काळ रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी थेट टोमॅटो कांदे रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला आहे.