Aaditya Thackeray in Nashik : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे नाशिकमध्ये
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेत.. ते अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतील. रात्री ते पुण्यातल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.