Nashik मधील दुगारवाडी धबधब्यावर 17 पर्यटकांची सुटका, एक पर्यटक अजूनही बेपत्ता शोध सुरु : ABP Majha
Continues below advertisement
पावसाचा जोर वाढला असताना देखील धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टहास नाशकात काही पर्यटकांच्या अंगलट आला.. त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या १७ पर्यटकांची मध्यरात्री सुटका करण्यात आली. तर काही पर्यटकांचा अजूनही शोध सुरुच आहे.. अविनाश गरड नावाच्या पर्यटकांचा अद्याप शोध लागलेला नाही.. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अचनाक पाण्याची पातळी वाढली आणि पर्यटक अडकले.. त्यात मोबाईल फोनला रेंज नसल्यानं सरकारी यंत्रणांशी संपर्क होत नव्हता.. मात्र सरकारी यंत्रणांना पर्यटक अडकल्याचं समजताच त्यांनी रात्री ७ वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं आणि १७ पर्यटकांची सुटका केली..
Continues below advertisement