Nashik Protest | नाशिकमध्ये भाजप कार्यालयासमोर नायडूंच्या प्रतिमेचं दहन, संभाजी ब्रिगेडचं आंदोलन
राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी काल खासदारकीची शपथ घेतली. पण हा शपथविधी भलत्याच कारणामुळे वादात सापडला आहे. शपथविधीनंतर उच्चारलेल्या जयघोषावर सभापतींनी आक्षेप घेतला आणि त्यावरुन महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण पेटलं आहे. या वादानंतर राज्यभरात शिवप्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलनं केली, नाशिकमध्ये वैकंय्या नायडू यांची प्रतिमा दहन करण्यात आली, तर राष्ट्रवादी युवक जय भवानी जय शिवाजी लिहिलेली 20 लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठवणार आहेत.
Tags :
Venkaiyya Naidu Nashik Protest Rajiv Satav Oath Ceremony Udayanraje Bhosale Rajyasabha Rajya Sabha Congress