MNS - Non Marathi Clash| नाशिकमध्ये परप्रांतीय व्यक्तीची 'भंगार' अरेरावी, MNS चा 'सोप'
नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. गाडी शिकणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने मराठी लोकांना 'भंगार' म्हणत अरेरावी केल्याचा आरोप आहे. तसेच, मराठी बोलण्यास नकार देत हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला. या घटनेची माहिती स्थानिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. परप्रांतीय व्यक्ती अरेरावी करत असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला 'चांगलाच सोप' दिला. नाशिक रोड पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. नाशिक शहरात पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. "तुम्ही मराठी लोक अ, तुम्हारी औकात क्या है, तुम्ही भंगार आहेत" असे बोलून शिवीगाळ केल्याचे आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचे मराठी कुटुंबाने सांगितले. या घटनेमुळे परप्रांतीयांची मुजोरी वारंवार समोर येत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.