Kolhapur : कोल्हापुरात दोन गटात राडा, एकमेकांवर दगडफेक, परिसरात तणावपूर्ण शांतता
Continues below advertisement
कोल्हापूर शहरातील Siddharthnagar कमानीजवळ दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. बानर लावण्याच्या वादातून दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेत अनेक गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. Circuit Bench पासून अगदी जवळच हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी राडा झालेल्या दोन्ही गटाच्या नागरिकांना शांततेचे आवाहन करत समजावून सांगितले आहे. "नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पोलिसांनी केले आहे, जेणेकरून शांतता भंग होणार नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement