Nashik Congress | नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार? BJP च्या गळाला लागल्याची चर्चा, काँग्रेसकडून अफवांचा इन्कार!

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसलाही खिंडार पडणार का, अशी चर्चा सुरू आहे. नाशिकमधील काँग्रेसचे काही बडे नेते भाजपाच्या गळाला लागल्याची माहिती मिळत होती. काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती होती. रविवारीच काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती. मात्र, नाशिक काँग्रेसकडून पक्षांतराच्या या चर्चा केवळ अफवाच असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नाशिक शहरात काँग्रेसचे नेतेही भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जात असल्याचं सांगण्यात आलं. एका जबाबदार व्यक्तीने स्पष्ट केले की, ज्या लोकांची नावं घेतली जातात, ज्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जातात, ते गेले पन्नास ते साठ वर्षांपासून काँग्रेसच्या विचाराला जोडलेले आहेत. "कुठलाही काँग्रेस पक्षाचा नेता भारतीय जनता पक्षात नाशिक शहरातला जाणार नाहीये ही अफवा पसरविण्याचं काम गमलाटी, दडपशाही, काहीतरी कुठेतरी ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं हे धोरण लोकांच्याही लक्षात आलेलंय. त्यामुळे याच्यापुढे ते यशस्वी होऊ शकत नाहीत," असेही स्पष्ट करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola