Mumbai High Tide | मुंबईला चार दिवस 'धोक्याचे', 26 जुलैला सर्वात मोठी 'भरती'!
मुंबईला पुढील चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आज, २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ४.६० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. २६ जुलै रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, ही या चार दिवसांतील सर्वात मोठी भरती असेल. याच दिवशी दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी ४.६० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना या भरतीदरम्यान समुद्रकिनारी न जाण्याचं आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असंही सांगण्यात आलं आहे.