Nashik | बारमध्ये पैसे मागितल्याच्या रागातून पोलिसाकडून मॅनेजरला मारहाण | ABP MAJHA

नाशिकच्या लेखानगरमधील एका बारमध्ये पोलिसानं बार मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आलीय. दारु आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण केल्याचा आरोप पोलिसावर करण्यात आलाय. बारमध्ये मारहाण करताना पोलिसानं एका सराईत गुन्हेगाराची मदत घेतल्याचंही बोललं जातंय. २० जानेवारीला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola