Marathwada Water Issue | औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ | ABP Majha
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भाल लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी आमदारांना जाब विचारलाय. औरंगाबादेत मराठवाड्यातील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकील फक्त नऊ आमदार उपस्थित होते. यामुळं मराठवाड्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थी आणि महिलांनी केलाय. यावेळी आमदार प्रशांत बंब यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.