Narayana Rane Speech :सुडाच्या राजकाराणातून आमच्या कार्यकर्त्यांना,लोकप्रतिनिधींना त्रास दिला जातोय:नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे. कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होऊ शकते असा दावा खुद्द नारायण राणे यांनीच व्यक्त केलाय..... या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोप त्यांनी केला. नारायण राणे यांनी कुडाळमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातले सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला.
तर आता राणेंच्या आरोपानंतर शिवसेनाही आक्रमक झालीयं... पोलिसांनी न घाबरता हल्ल्यातील सूत्रधारावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या कणकवली पोलीस स्थानकात जाणार आहे.. त्यामुळे उद्या शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News नारायण राणे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live नारायण राणे Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News