Rane Slams Uddhav | शिवसेना अधोगतीला कोण जबाबदार? राणेंचा मोठा दावा
ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत असतानाच, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनीच छळले आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केले, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. केवळ राज ठाकरेच नव्हे, तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनीही ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडल्याचा दावा नारायण राणेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. 'जो भून से गई व हौद से नहीं आती' असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना 'भाऊबांकी' या नात्याने परत येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरे यांना त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केले होते, याची त्यांना जाणीव नाही, असे राणेंनी म्हटले आहे. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले, पण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत आणले, पण उद्धव ठाकरेंनी ती सत्ता गमावली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मराठी माणसाने आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवले. गेलेले परत मिळविण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, असेही राणेंनी स्पष्ट केले आहे.