Nandurbar : ऊसतोड कामगारांचा संशयास्पद मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी : ABP Majha
ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तालुक्यातील तोंडले येथे गेलेल्या कालिबेल तालुका धडगांव येथील ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयांस्पद मृत्यू झाला होता.या प्रकरणी रवी चव्हाण, मनोज चव्हाण, रा.तोंडले ता. माळशिरस जि. सोलापूर तसेच मुकादम आट्या वन्या वळवी रा. कालिबेल ता. धडगांव जि. नंदुरबार यांची सखोल चौकची करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हापोलीस अधीक्षक यांच्याकडे नातेवाईकांनी केली आहे .