Rahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणा

Continues below advertisement

Rahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणा 

महाराष्ट्रातील तब्बल पाच लाख रोजगार या महाराष्ट्र सरकारने या राज्याबाहेर घालवल्याने राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही, त्यांना कामासाठी बाहेर जावे लागते असे सांगत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमधील जाहीर सभेमध्ये राज्यातील किती प्रकल्प बाहेर गेले याची कुंडलीच मांडली. आमचं सरकार आल्यानंतर या गोष्टी होऊ देणार नाही, दोन्ही राज्यातील प्रकल्प दोन्ही राज्यांमध्ये असतील अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.  राज्यातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधी यांनी नंदुरबार सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामधून किती प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आले? याची यादीच सादर केली. ते म्हणाले की वेदांता फाॅक्सकाॅन सेमीकंडक्टर  प्रकल्प होता त्यामधून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. 1.2 लाख कोटींचा हा प्रकल्प होता, हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गुजरातला पाठला. टाटा एअरबस मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा सुद्धा 1.8 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. आयफोन निर्मितीचा दोन लाख कोटींचा प्रकल्प ज्यामधून 75 हजार युवकांना रोजगार मिळाला असता तो सुद्धा प्रकल्प गुजरातला या लोकांनी पाठवून दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. ड्रग्स पार्क मधून 80 हजार जणांना रोजगार मिळणार होता तो सुद्धा गुजरातला गेला. गेल पेट्रोल केमिकल प्रोजेक्ट हा 7 हजार कोटींचा प्रकल्प होता. यामधून 21 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. मात्र हा प्रकल्प सुद्धा दुसऱ्या प्रदेशात पाठवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. हे सर्व मिळून विचार केलास राज्यातील पाच लाख नोकऱ्या या दुसऱ्या भागांमध्ये या सरकारने पाठवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे कामा इंडिया आघाडी करणार नाही, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram