![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/95d9780ac41e3b8973093505bd339e7a1701139611691719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेतीसह घरांचही नुकसान
Continues below advertisement
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेतीसह घरांचही नुकसान ऐन थंडीत अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय. याच आव्हानातून आता सावरायचं कसं असा मोठ्ठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलंय. नंदुरबारमध्ये गेल्या 36 तासांत नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांपैकी 25 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नंदुरबारमध्ये ६८ मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नवापूर अक्कलकुवा धडगाव तालुक्यात घरांचे नुकसान झालंय. तसंच या अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारठा देखील वाढलाय. त्यामुळे सपाटी भागात तापमान 17 अंश ते डोंगराळ भागात 15 अंश सेल्सियसवर गेलंय. तसंच अजून तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement