Nandurbar Pregnant Woman Scary Incident :आदिवासी भागात सुविधांची वाणवा, गरोदर महिलेचा जीवघेणा प्रवास

Continues below advertisement

नाशिकमध्ये पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करणाऱ्या आदिवासी महिलांचा प्रवास पाहिला आता जाऊय़ात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात.. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांची किती भीषण परिस्थिती आहे याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे... आरोग्य सुविधा नसल्याने गरोदर महिलेला झोळीत टाकून आरोग्य सेवक आणि नातेवाईकांना डोंगरदऱ्यातून प्रवास करावा लागला.. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या कुवलीडांबर या गावात राहणाऱ्या विमल वसावे या गरोदर महिलेला अचानक पोटात कळा सुरू झाल्या.. आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकेने प्राथमिक उपचार केले. मात्र वेदना कमी होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विमल वसावे यांना बांबूची झोळी तयार करून तब्बल सहा किलोमीटर डोंगरदऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात दाखल केले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram