Nandurbar Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट, एक हँडपंप भागवतो शेकडोंची तहान

Continues below advertisement

एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या बोदला गाव सध्या भीषण पाणीटंचाईच्या सामना करत आहे. बोदला गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोंगराळ भागातून वाट काढावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी या महिलांना 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे..1500 लोकसंख्या असलेल्या बोदला गावात 25  हुन अधिक हातपंप आणि विहीर असून त्या मार्च महिन्यातच आटल्याने या गावकऱ्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. गावात असलेला हा एकमेव हातपंप आता 300 कुटुंबीयांची तहान भागवत आहे.. आपल्या लहान लेकरांना हाताशी घेऊन या आदिवासी महिला एक ते दोन पायपीट करून या हातपंपावर पाणी भरण्यासाठी येतात मात्र एकमेव असलेल्या प्रमाणात पाणी भरणाऱ्यांची गर्दी होते जास्त गर्दी झाल्याने त्या ठिकाणी नंबर देखील लावावा त्यातच जर पंपाचे पाणी आटलं तर ते 4 तास पाण्याची वाट बघत या ठिकाणी थांबव लागत असल्याचं विदारक चित्र आहे चित्र हे सातपुड्यात पाहायला मिळत आहे. गावात असलेला हा एकमेव हात पंप जर बंद झाला तर येणारा काळात या गावकऱ्यांना याहून अधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या  लागणार आहेत....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram