
Aamshya Padvi on Nandurbar drought : नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करा अन्यथा आंदोलन करू - पाडवी
Aamshya Padvi on Nandurbar drought : नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करा अन्यथा आंदोलन करू - पाडवी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र अनेक भाग दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलेले आहेत, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा आणि तळोदा या तालुक्यातील काही मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. परंतु अनेक भागात अजूनही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही . सरकार फक्त गाजावाजा करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही उभे राहत नसल्याच्या आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे. जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस पडला मात्र मध्यंतरी मोठा खंड पडला होता तर शेवटी काही प्रमाणावर पाऊस पडला त्यामुळे सुरुवातीला आणि शेवटी पडलेला पावसामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं आहे. जिल्ह्यात आतापासूनच पाण्यासाठी टँकरची गरज पडत आहे मग दुष्काळ का नाही नंदुरबार जिल्ह्यात १००% दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला.