Nandurbar : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सोयाबीनचे दर ५ हजार २०० रुपयांवर गेलेत. हे दर आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.... केंद्र सरकारने सोयाबीनचं स्टॉक लिमिट मागे घेतल्यानंतर दरात वाढ झाल्याचं दिसतंय. सोयाबीनमधील पाण्याचा ओलावा पाहून दर ठरवला जातोय. सध्या बाजारपेठेत रोज १५०० ते दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक होतेय.