ABP News

Sanjay Pawar Join Shivsena : नांदगावचे माजी आमदार संजय पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Continues below advertisement

Sanjay Pawar Join Shivsena : नांदगावचे माजी आमदार संजय पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश  नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या खांद्यावर भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले यावेळी मंत्री दादा भुसे आ.सुहास कांदे हे उपस्थित होते..माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांचा मुंबईच्या बाळासाहेब भुवन येथे हा प्रवेश  सोहळा पार पडला..आ.सुहास कांदे यांच्या पुढाकाराने माजी आमदार संजय पवार हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाले..संजय पवार हे २००४ ते २००९ ला नांदगाव मतदार संघाचे आमदार होते..तर २००९ ला पंकज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता..त्यानंतर पवार यांनी शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता..मध्यंतरीच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांची ' मराठा आरक्षण ' प्रश्नी असलेली भूमिका मान्य नाही असे कारण देत राष्ट्रवादीतून संजय पवार हे बाहेर पडले होते..संजय पवार यांनी शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आता पुन्हा शिवसेनेत असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram