Ajit Pawar on Eknath Khadse : खडसेंच्या मनात अनेक दिवस चल-बिचल, अजित पवारांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा.
 एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. बरेच दिवस त्यांची घालमेल सुरू होती, आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं असं अजित पवार म्हणालेत. काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो, आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतोचं पण लवकरच याबाबत निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड मध्ये थेरगाव इथ रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी ही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola