Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू
Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू
नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली. मध्यरात्री ही चोरी झाली . बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे .. रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली . घटना स्थळी मोठी दोरी आणि एक पोत पोलीसांना आढळलं. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला.त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले . एटीएम मशिन मध्ये रककम किती होती याची अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणात थेट एटीएम मशिनच पळवून नेल्यामुळे या प्रकरणाची चर्चा मात्र तुफान होते आहे. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.