TOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 15 एप्रिल 2024 : ABP Majha
TOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 15 एप्रिल 2024 : ABP Majha
निकोबार बेट आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, गेल्या २४ तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस, तर ३१ मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर, नयनरम्य दृश्य पाहून घाटातून ये जा करणारे पर्यटक, नागरिकांना भुरळ.
चिपळूणमधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस... मे महिन्यात ओढे प्रवाहित.
सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घावनळे गावातील अनेक झाडं कोसळली, आंबा, काजूची झाड सोसाट्याच्या वाऱ्यानं उन्मळून पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
काल शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक मार्गांवर झाडे कोसळली, यामुळे अनेक रस्ते बंद, तर गेल्या १६ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांचे हाल.
मुंबईतील ६ जागंसाठी उद्या मतदान, दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत २ हजार ५२० मतदान केंद्र, या पार्श्वभूमिवर निवडणूक अधिकाऱ्यांना मतपेट्या आणि साहित्यांचं वाटप.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उद्या मतदान, दादरमध्ये सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन वाटप सुरु.