Nanded Kamtha : कामठ्यामध्ये खंडेरायाच्या यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेसाठी गर्दी ABP Majha

Nanded Kamtha : कामठ्यामध्ये खंडेरायाच्या यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेसाठी गर्दी ABP Majha

माळेगाव यात्रेनंतर नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधार्पूर तालुक्यातील कामठा बु. येथील जागृत देवस्थान खंडेरायाची यात्रा ही प्रसिद्ध असून या यात्रेत तलवारीचे वार अंगावर झेलण्याची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. चार जिल्ह्यातून सर्व जाती धमार्चे भाविक मोठ्या संख्येने येतात आणि राष्ट्रीय सलोखा, ऐक्य जोपासणारे चित्र आपणास पहावयास मिळते. कामठा (बु.) येथील खंडेराया यात्रेस आज पासून प्रारंभ होत आहे. आज  खंडेरायाच्या विधीवत पुजा, आरत्या आणि छबीना निघणार काढून श्री खंडेरायांचा भव्य पालखी सोहळा निघणार आहे. त्यानंतर दि. 21,22 जानेवारी रोजी भव्य शंकर पट स्पर्धा आयोजित आलीय. तर दि.23 जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांच्या सामने होणार आहेत. अशा या पांच दिवस चालणाऱ्या खंडेराया यात्रेसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूरसह मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रध्देने देवदर्शनासाठी येथे येतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola