Nanded Cloudburst | मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत, NDRF दाखल
नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळा, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादवे यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. नांदेडच्या मुखेडमध्ये झालेल्या या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.