ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 18 AUG 2025 : ABP Majha

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. सी पी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात मल्लिकार्जुन खर्गेंच्या कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंगांनी खर्गेंना फोन केला. मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना "सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा अन्यथा देशाची माफी मागा" असे आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर, "आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे शपथपत्र का मागत नाही?" असा सवाल केला. बेचाळीस वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून, कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन झालं. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील प्रलंबित खटले आता सर्किट बेंचमध्ये चालवले जातील. ट्रंप आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola