Ladki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळा
Ladki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळा
नांदेड जिल्ह्यात लाडक्या बहिनीची फसवणूक झाल्याचं प्रकार उघड झाला.. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं .. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो .. रोजगार हमी योजनेसाठी म्हणुन त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड बँक पासबुक जमा केले. मात्र अर्ज भरताना लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरले. महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करुन त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले .. . पैसे जमा झाल्यानंतर त्या त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे उचलले .. माझे रोजगार हमी योजनेचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असे सांगून त्याने पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले .. गावतील सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते .. त्याने देखील सीएससी केंद्र चालकाला नेऊन दीले . पण शंका आल्याने अलीम याने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा लाडकी बहिण योजनेचे ते पैसै असल्याचे त्याला कळाले आणि सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचे उघड झाले .. गावातील अन्य पुरुषांच्या मोबाईलवर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झाल्याचे मॅसेज आले .. हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्र चालक सचिन थोरात फरार झाला .. गावातील जवळपास 37जणांची त्याने फसवणुक केल्याचे उघड झाले .... या प्रकरणाची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे ...