Nanded Cloudburst | मुखेडमध्ये Cloudburst, 5 जणांचा मृत्यू; MLA 48 तासांनी पोहोचल्याने संताप
मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. हसनाळ गावात या पावसामुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मोठ्या आपत्तीनंतरही स्थानिक आमदार अठ्ठेचाळीस तासांनी घटनास्थळी पोहोचले. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप दिसून आला. मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तुषार राठोड दुपारी अडीच वाजता गावात पोहोचले. नागरिकांनी त्यांना जाब विचारला. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले जातील, अशी माहिती आमदारांनी दिली. हसनाळ गावात सैन्य दलाचे मदत कार्य आजसाठी संपले आहे. संभाजीनगरहून आलेली सैन्य दलाची तुकडी आजचे मदत कार्य पूर्ण करून मुखेडमध्येच थांबणार आहे. रात्री पुन्हा पावसाची स्थिती निर्माण झाल्यास उद्या मदत करता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.