Mumbai Rains | मुंबई-कोकणात Red Alert, समुद्रात High Tide; वाऱ्याचा वेग वाढला!

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्रात मोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत. मुंबईत आज सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी उधाणाची भरती (High Tide) अपेक्षित आहे, त्यामुळे या वेळेस समुद्रात लाटा अधिक उसळण्याची शक्यता आहे. दादर चौपाटीवर रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला असतानाही काही नागरिक पावसाचा आनंद लुटताना आणि मुले फुटबॉल खेळताना दिसले. मुंबई पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी समुद्राजवळ कोणीही जाऊ नये यासाठी सतर्क आहेत. समुद्राचा आवाज आणि लाटांचा वेग पाहता समुद्र खवळलेला दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि वाढलेल्या वाऱ्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरही वाऱ्याचा वेग ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, जो पासष्ट किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola