Aaditya Thackeray at Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत सहभागी होणार
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज या यात्रेत सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात हिंगोली जिल्ह्यात आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार आहेत. या निमित्तानं गांधी आणि ठाकरे कुटुंबातील दोन नेते प्रथमच जाहीररित्या एकत्र येणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्यावतीनं आज आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आज आदित्य ठाकरेंच्या सहभागाकडे सर्वांचं लक्ष असेल.