Nana Patole suspended | विधानसभेत राडा, नाना पटोलेंचं निलंबन!

Continues below advertisement
महाराष्ट्र विधानसभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षांनी एक दिवसासाठी निलंबित केले. शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांवरून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. यावेळी आक्रमक झालेले नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी राजदंडालाही स्पर्श केला. नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांचे निलंबन केले. पटोले यांच्या निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला. जोपर्यंत शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे नेते माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा पवित्रा पटोले यांनी घेतला. "मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही," असे वक्तव्य पटोले यांनी केले. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणे हे अशोभनीय आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले. सभागृहाचे कामकाज नियमित चालण्यासाठी हे निलंबन करण्यात आले. दरम्यान, पाच जुलैला दोन बंधू एकत्र येणार असून त्यांचे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola