Praful Patel on Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं
अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील असा विश्वासही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केलाय.. हे आपलं मत नसून शरद पवारांचं मत असल्याची पुष्टीही पटेलांनी जोडली आहे.