Vinayak Raut Full PC : नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची नाही? UNCUT PC

Continues below advertisement

Vinayak Raut Full PC : नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची नाही? UNCUT PC


संभाजी नगरपेक्षा जबरदस्त सभा होणार यात कुठली शंका नाही, जोरदार ताकद महा विकास आघाडीची सभेच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे सभेपूर्वीच अनेकांच्या पोटात गोळा उठलेला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत हे आज नागपुरातील वज्रमूठ सभा होत असलेल्या मैदानाच्या पाहणीसाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सुनील केदार तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.पोटात पोटशूळ असल्यानं सभा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून तिथे जातीय दंगल घडवण्यात आली. नागपुरात महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर त्यांना धक्का बसणार असल्याने सभेला विरोध करत. नौटंकी सुरू आहे. पण अपशकुन निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे. कितीही काळ्या मांजरी आडव्या आणली तरी नागपुरातील ही सभा होणारच आहे.* ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणार ही सभा ठरेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram