Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार

हेही वाचा : 

परांडा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (दि.23) दिवंगत नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांना या जागेवर दावा केला होता. त्यानंतर जागेवर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.   रणजीत पाटील यांनी मातोश्रीवरुन एबी फॉर्म  घेतला शिवसेना ठाकरे गटाकडून अखेर परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना एबी फॉर्म उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे. परांडा विधानसभा मतदारसंघात रणजीत पाटील यांना काल पहिल्या शिवसेना ठाकरे गटाच्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा दावा केला होता. त्या ठिकाणी त्यांचे इच्छुक उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांचं नाव चर्चेत होतं.  मात्र असं असताना आज उद्धव ठाकरेंनी  परांडा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटच लढणार असून रणजीत पाटील यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करून शिक्कामोर्तब केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram