BJP Nagpur : भाजपचे जुने नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर काँग्रेसमध्ये, भाजपमध्ये छळ झाल्याचा आरोप
Continues below advertisement
एकीकडे बावनकुळेंच्या विधानपरिषदेचा अर्ज भरतेवेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केलं जात असताना तिकडे जुने भाजप नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना भोयर यांचाच सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर छोटू भोयर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपमध्ये छळ झाल्याचा हल्लाबोल भोयर यांनी केलाय.
Continues below advertisement