Uttar Pradesh Religious Conversion : उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणाचे बीडपाठोपाठ नागपूर कनेक्शन?
उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणाचे बीडपाठोपाठ नागपूर कनेक्शन असल्याची माहिती समोर येतेय. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. उत्तर प्रदेश एटीएसने नागपुरात येऊन ही कारवाई केलीय. नागपुरातून ज्या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय त्या तिघांवर नागपूर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत होती. हे तिघे नागपुरात असल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एटीएस नागपुरात पोहोचले. यूपी एटीएसने या तिघांना ताब्यात घेऊन उत्तर प्रदेशला रवाना झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांचा धर्मांतर प्रकरणाशी काय आणि कसा संबंध हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.