चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णय अत्यंत अयोग्य अन् दुर्दैवी : डॉ. अभय बंग

Continues below advertisement

चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णय अत्यंत अयोग्य अन् दुर्दैवी : डॉ. अभय बंग

चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाने नुकसानच आहे याचा निषेध विरोध व्हायला हवा अशी प्रतिक्रिा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी दिली आहे. हा निर्णय अत्यंत अयोग्य आणि दुर्दैवी असल्याची टीका करत अंमलबजावणी होत नसल्याने दारू बंदी उठवली हा अजब तर्क राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी लागू होणार का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. 

कोरोना नियंत्रणाचे तीन-तेरा झाले, मग नियंत्रण थांबवायचे का? असा उद्विग्न सवालही त्यांनी विचारला. राज्य कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारूचा महसूल हवा हा कुतर्क, 1000 कोटी वैध तर 500 कोटी अवैध दारू महसूल कुणाच्या खिशात जाणार याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडलं.

सदर निर्णय़ामुळे सहा लाख कुटुंब प्रभावित  तर 80 हजार पुरुष व्यसनी होणार असल्याची भीती व्यक्त करत, महिलासंदर्भातील गुन्हे आकड्यांमध्ये मोठी वाढ तर आदिवासी जनतेवर मोठा परिणाम होण्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram