'मॅन ऑफ द मॅच, पेट्रोल 100* नॉट', ठाण्यात बॅनरद्वारे राष्ट्रवादीची पंतप्रधान मोदींवर टीका
Continues below advertisement
एकीकडे कोरोनामुळे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पेट्रोलच्या दरवाढीमुळे देखील आता सर्व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बॅनर लावण्यात आलेला आहे. पेट्रोलच्या किमती या प्रति लिटर शंभर रुपये पोहोचल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हरिनिवास सर्कल इथे एक बॅनर लावून त्यावर सफेद दाढीमध्ये एक क्रिकेटपटू दाखवला आहे. या क्रिकेटपटूच्या खाली त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब देऊन त्याचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. तसेच अच्छे दिनाच्या शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहे. या बॅनर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Continues below advertisement