Telangana CM KCR in Vidharbha : बीआरएसचं उपराजधानी नागपुरात पक्षाचं पहिलं कार्यालय

Continues below advertisement

लोकसभेची निवडणूक व्हायला अजून एक वर्ष आहे. मात्र त्यावेळी भारत राष्ट्र समिती म्हणजे BRS ने महाराष्ट्रात पाय घट्ट रोवण्याचा निर्धार केलाय. त्याचाच भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या BRS चं महाराष्ट्रातील पहिलं कार्यालयं नागपुरात म्हणजे राज्याच्या उपराजधानीत थाटलंय. आणि त्याचं उद्घाटनही त्यांनी आज केलंय. भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय. मध्यंतरी मराठवाड्यात BRS पक्षाने प्रवेश केल्यांनातर महाराष्ट्रासह देशात कायमरूपी बस्तान बसवण्याची संपूर्ण तयारी केलीये. आणि त्याचाच भाग म्हणून पहिलं कार्यालय नागपुरात सुरू केलंय. यावेळी राज्यातील पाणीप्रश्नावरुन के.सी. राव यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. तर महाराष्ट्रात तेलंगणा पॅटर्न लागू केल्यास महाराष्ट्र सरकारच्या नाकीनऊ येतील असा टोला के.सी राव यांनी लगावला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram