Mumbai Water : मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, जुनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय : ABP Majha
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव साठा मिळून ४८ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. मात्र जून महिना निम्मा ओसरला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आणखी १५ दिवस वाट पाहून जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.